बॉलीवूडमध्ये कोण 'चिमडी',कोण 'रेमंड';जाणून घ्या कलाकारांचे 'निक नेम'

प्रणाली मोरे

श्रद्धा कपूरची 'चिमडी','रानी','श्रद्धस'अशी तीन वेगवेगळी नावं आहेत. 'श्रद्धस' हे तिच्या नावाचं शॉर्टफॉर्म आहे.

Shraddha Kapoor | Google

वरुण धवनला 'वीडी' नावानं त्याचे चाहते संबोधित करताना अनेकदा दिसून आलं आहे. पण घरी मात्र तो सर्वांचा 'पप्पू' आहे.

Varun Dhawan | Google

कपिललला त्याचे सहकलाकार 'कापू' नावाने तर चाहते 'टोनी' नावानं हाक मारतात.

Kapil Sharma | Google

श्वर्याला प्रेमानं 'गुल्लू' म्हणतात. श्वेता नंदाची मुलं तिला 'गु्ल्लू' मामी म्हणतात,हे एका मुलाखतीतून श्वेता नंदानंच याविषयी खुलासा केला होता.

Aishwarya Rai-Bachchan | Google

आलिया लहानपणी गुडगुडीत असल्याकारणानं तिला घरी 'आलू-कचालू' म्हणायचे. आजही 'आलू' नावानं काहीजण तिला हाक मारतात.

Alia Bhatt | Google

अनुष्काचे आई-बाबा तिला 'नुष्केश्वर','नुश्की' नावानं हाक मारतात. विराट देखील तिला याच नावानं हाक मारतो.

Anushka Sharma | Google

नीतू कपूर रणबीरला लाडानं 'रेमंड' नावानं हाक मारतात. रिषी कपूर यांना रणबीरला निक नेम द्यायचे नव्हते. कारण त्यांना कुणी 'चिंटू' म्हटलेलं स्वतःलाच आवडायचं नाही. पण नीतू कपूर यांच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir Kapoor | Google