बिपाशा-करणचा मालदीवमध्ये रोमांस; शेअर केले झक्कास PHOTO

Balkrishna Madhale

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या चित्रपटांत कमी, पण सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह पहायला मिळतेय.

बिपाशा, तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत मालदीवमध्ये ट्रीप एन्जॉय करतेय. या ट्रीपचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

या ट्रीपमध्ये बिपाशानं ब्लू प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला असून तिनं फोटो शेअर करताना उफ्फ, द हॅपी ब्ल्यूज.. असं कॅप्शनही लिहिलंय.

काही फोटोंत करण आणि बिपाशा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत, तर बिपाशानं तिच्या अनेक फोटो आणि व्हिडिओंना ‘मंकी लव्ह’ असं हॅशटॅग दिलंय.

बिपाशा आणि अभिनेता करण सिंह ग्रोवरच्या लग्नाला 5 वर्षे झाली असून या 5 वर्षांत या जोडप्याचं सुंदर बंधन चर्चेत राहिलंय. दोघेही एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ या सिनेमावेळी बिपाशा आणि करणची भेट झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले.

लॉकडाउनकाळापासून मालदीव हे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रत्येकाचं आवडतं सुट्टीचं ठिकाण बनलंय. या सुंदर ठिकाणी सेलिब्रटी आपल्या जोडीदारासोबत येत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bipasha Basu