धकाधकीच्या आयुष्याला वैतागलाय ? यंदाच्या सुट्टीसाठी खास ८ ट्रेक

नमिता धुरी

तडिया दमोह ट्रेक, कर्नाटक

कर्नाटकच्या कुर्गमध्ये असणारा तडिया दमोह ट्रेक अतिशय निसर्गरम्य आहे. येथे गिर्यारोहण करताना नदी, जंगल आणि परदेशी फुले पाहायला मिळतात.

राजमाची ट्रेकी, महाराष्ट्र

राजमाची हे ठिकाण लोणावळ्यापासून १५ किमी दूर आहे. येथे प्राचीन श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ले पाहायला मिळतात.

धोत्रेय टंगला ट्रेक, पश्चिम बंगाल

येथील हिरव्यागार जंगलात अनेक वन्यप्राणी आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे गिर्यारोहणासाठी गेल्यास पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता असते.

त्रिउंड ट्रेक, हिमाचल प्रदेश

११ किमीचा हा ट्रेक मॅक्डॉलगंज आणि धर्मकोट यांच्या मधे आहे. ट्रेक संपत असलेल्या ठिकाणी उंचावर वनविभागाचे अतिथीगृह असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते.

चेब्रा चोटी, केरळ

७ किमीच्या या ट्रेकवर अतिशय सुंदर निसर्गदृश्ये आणि कीटक पाहायला मिळतात.

रुपकुंड ट्रेक, उत्तराखंड

३ हजार २०० मीटर उंचीवर लोहाजंगबपासून सुरू होऊन रुपकुंड तलावाजवळ हा ट्रेक संपतो.

जोंगरी ट्रेक, सिक्कीम

हा ट्रेक करताना हिमालयातील माऊंट कंचनजंगासारख्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडते.

दयारा बुग्याल, उत्तराखंड

उत्तराखंडच्या या सुंदर ट्रेकमधे देवदार आणि रोडोडेंड्रोमची झाडे पाहायला मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.