'या' खेळाडूंनी कसोटीत एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा

सकाळ डिजिटल टीम

जसप्रीत बुमराह त्याच्या गोलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र शनिवारी त्याने इंग्लंडमध्ये आपल्या बॅटने इतिहास रचला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 35 धावा केल्या.

1877 पासून म्हणजेच 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील हे सर्वात महागडे षटक आहे. स्टुअर्ट ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले आहे.

ब्रायन लाराने 2003 मध्ये पिटरसनच्या एका षटकात 28 धावा केल्या होत्या.

केशव महाराज देखील या यादीत 2020 मध्ये सामील झाला होता. त्याने जो रूटच्या एका षटकात 28 धावा चोपल्या होत्या.

2013 ला जॉर्ज बेलीने जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा करत या विक्रमाची बरोबरी केली होती.

विक्रमाच्या यादीवर नजर टाकली तर कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांमध्ये इंग्लंडचे तीन गोलंदाज आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.