Bandra-Worli sea link हा बनला मुंबईतील प्रेक्षणीय जागांपैकी एक !

सकाळ डिजिटल टीम

या प्रकल्पाच्या प्रस्तावित असण्यापासून तर लोकार्पणापर्यंत तो कायम चर्चेचा विषय होता.

जवळपास १६०० कोटी रुपये खर्च हा पुल (bridge) उभा करण्यात आला आहे. त्यावरचा टोलही (toll) जास्त आहे.

या पुलाचं मुळ नाव आहे, राजीव गांधी सीलिंक (Rajiv Gandhi sea link) दिवंगत पंतप्रधान (Prime Minister) राजीव गांधी यांचे नाव या लिंकला दिले असले तरीही या पुलाची ओळख वांद्रे-वरळी सीलिंक अशीच आहे.

भारतातील (Indai's) हा पहिला असा सी लिंक आहे, ज्यावर तब्बल ८ लेन (8 lane) आहेत. भारतातल्या कोणत्याही सीलिंकवर ८ लेन नसल्याने वांद्रे-वरळी सीलिंक अनोखा ठरला आहे.

वांद्र्यातून वरळीत येण्यासाठी जवळपास ६० ते ९० मिनिटे लागतात. मात्र या लिंकमुळे अवघ्या २० ते ३० मिनिटात हा प्रवास आता करता येतो.

हा पुल सुरू झाला तेव्हा सुरुवातीचे ३० दिवस या पुलावर मोफत प्रवास करता येत होता. मात्र त्यानंतर या लिंकवर येण्यासाठी ६० रुपये टोल भरण्याचा नियम लागू करण्यात आला. देशभरात असलेल्या सीलिंकच्या टोलमध्ये हा टोल सगळ्यात जास्त आहे असं म्हटलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.