शिर खुरम्याने करा ईदचा दिवस गोड : पाहा रेसिपी

नमिता धुरी

मुंबई : ईदच्या सणानिमित्त शिर खुरमा करण्याची परंपरा आहे. यासाठी २०० ग्रॅम शेवया, २ लीटर दूध, दोन कप साखर, पाच छोट्या वेलची, चिमूटभर केशर, इत्यादी जिन्नसांची आवश्यकता असते.

google

आधी एका नॉन स्टीक पॅनमध्ये मध्यम आचेवर तूप गरम करून घ्यावे. त्यात शेवया घालून त्या सोनेरी होईपर्यंत भाजाव्यात.

google

मध्यम आचेवर दूध गरम करावे. वेलची आणि केशर घालून दूध अर्धे होईपर्यंत आटवा.

google

आटवलेल्या दुधात साखर घालावी. ते खाली लागू नये यासाठी ढवळत राहावे.

google

शेवया आणि सुका मेवा घालून ५ मिनिटे शिजवावे.

google

आता तयार झालेल्या शिर खुरमावर काजू-बदाम घालून त्याला सजवावे. आता शिर खुरमा खाण्यासाठी तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

google