दातांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे नियम नक्की पाळा

नमिता धुरी

दातांचे आरोग्य न राखल्यास त्यांना कीड लागते किंवा तोंडातून वास येण्यास सुरूवात होते. त्यामुळे दातांच्या सुदृढ आरोग्यासाठी काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी.

सतत वापरल्याने ब्रशच्या केसांची क्षमता कमी होते. त्यावर जंतूही जमतात. त्यामुळे दर १२ ते १६ आठवड्यांनी ब्रश बदलावे. एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्वरीत ब्रश बदलावे.

दिवसातून दोन वेळा दात घासणे चांगले मानले जाते; मात्र यासाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे. संत्रे, कॉफी यांसारखे आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात घासू नये. आम्लाचा परिणाम कमी होण्यासाठी ३० मिनिटे वाट पाहा.

अतिशय जोर लावून ब्रश दातांवर घासल्यास दातांच्या मुळांना आणि नसांना हानी पोहोचते. त्यामुळे कधीही जोर लावून दात घासू नयेत.

दातांशी संबंधित विकार झाल्यावरच लोक डॉक्टरकडे जातात. असे न करता वर्षातून दोनदा दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यामुळे दातांशी संबंधित विकारांची लक्षणे वेळेत ओळखता येतील.

दातांच्या मधल्या फटींमध्ये अन्न अडकून राहिल्यास कीड लागणे, हिरड्यांचे विकार या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे दातांमधील फटी नियमितपणे स्वच्छ कराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.