अंडे
ओमेगा ३ फॅटी अॅसिडने युक्त असलेले अंडे मेमरी स्टेमसेल बनवण्यास मदत करतात. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते.
मासे
सॅल्मन, ट्युना आणि मॅकरेल या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हे मासे मुलांना नक्कीच खायला द्यावेत.
पीनट बटर
ई जीवनसत्त्वाने युक्त असे पीनट बटर मज्जासंस्था बळकट करते आणि मस्तिष्काला अधिक कार्यक्षम बनवते.
ओट्स
ई, बी जीवनसत्त्व आणि झिंकने युक्त असे ओट्स मेंदूला अधिक कार्यक्षण बनवतात.
सुका मेवा
मेंदूच्या विकासासाठी सुका मेवा उपयुक्त ठरतो.