महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असूनही रितेशनं अभिनयात घडवलं 'करिअर'

| Sakal

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा आहे. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

| Sakal

रितेशला अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) असे दोन भाऊ असून ते दोघेही राजकारणात आहेत.

| Sakal

राजकीय कुटुंबातील असूनही रितेशनं वेगळं होऊन अभिनेता होण्याचं ठरवलं. रितेशनं जेव्हा त्याच्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा सर्वांना वाटत होतं, की तो या इंडस्ट्रीत आपलं नाव कमावू शकणार नाही.

| Sakal

मात्र, रितेशनं या सर्वांची तोंडं बंद केली. आज रितेशला अभिनय क्षेत्रात 19 वर्षे झाली आहेत.

| Sakal

रितेशनं आपल्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात रितेशसोबत जेनेलिया डिसूजाही होती.

| Sakal

'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

| Sakal

रितेशनं त्याच्या करिअरच्या सुरुवातीला कॉमेडी भूमिका केल्या आहेत. पण, नंतर रितेशनं खलनायक बनून प्रयोग करण्याचं ठरवलं.

| Sakal

रितेशनं अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारलीय. विशेष म्हणजे, रितेशनं खलनायक बनूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

| Sakal

अभिनयात उत्कृष्टता दाखवल्यानंतर रितेशनं निर्माता म्हणूनही काम केलं. 2013 मध्ये त्यानं मुंबई फिल्म कंपनी नावानं त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय.

| Sakal