जर तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि घराच्यांना त्या व्यक्तीबद्दल सांगायचे असल्यास काही सोप्या ट्रिक्स माहित असणे आवश्यक असते.
तुमच्या प्रेमाबद्दल पालकांसोबत थेट न बोलता सुरुवातीला त्यांना काही हिंट देत रहा. ज्यावेळी तुमच्या लग्नाचा विषय निघेल त्यावेळी त्यांना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या काही हिंट द्या.
घरातील वातावरण पाहून लग्नासंदर्भात बोला. जेणेकरुन पालक काही गोष्टी समजावून घेतील.
जर कुटुंबिय प्रेमविवाहासाठी तयार होत नसेल तर थोडा सयंम ठेवून त्यांना विचार करण्यास वेळ द्या.
तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये कुणाचा प्रेमविवाह झाला असल्यास त्याचे उदाहरण देऊन समवजवण्याचा प्रयत्न करा.
कुटुबियांसोबत तुम्हाला याविषयी काही बोलता येत नसेल तर मित्रांची किंवा जवळच्या विश्वासातील व्यक्तीची मदत घ्या.
तुमचे कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाने खुश असतील आणि आजुबाजुचे लोक जर त्यांना भडकवत असतील तर अशा लोकांपासून दूर रहा.
तुम्ही निवडलेल्या साथीदारासोबत एकदा घरातील मंडळींशी भेट घालून देण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्यांना तुमची पसंद आवडू शकेल.