आवळ्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते व कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहाते. त्यामुळे घरच्या घरी मोरावळा तयार करून नक्की खा.
मोरावळा करण्यासाठी आवश्यक आहे २५० ग्रॅम आवळा, १ कप साखर आणि चिमूटभर वेलची पावडर.
आवळा मऊ होईपर्यंत वाफवा.
गरम केलेल्या कढईत उकडलेला आवळा घाला आणि वरून एक कप साखर घाला.
कढईवर झाकण ठेवून थोडा वेळ तसेच ठेवा.
साखर आवळ्यामध्ये विरघळली आणि उकळू लागली की वरून चिमूटभर वेलची पावडर घाला.
आवळ्याला थोडा वेळ तसेच ठेवा जेणेकरून तो पाक शोषून घेईल.
मोरावळा तयार आहे. तुम्ही दोन दिवस तो खाऊ शकता.