IPL प्ले ऑफ मधले 'शतकवीर'

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुरली विजयने २०१२ मध्ये क्वॉलिफायर २ मध्ये दिल्लीविरुद्ध ५८ बॉलमध्ये ११३ धावा करत नॉकआऊटमध्ये शतक ठोकले. यामध्ये १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये क्वालिफायर २ मध्ये चेन्नई विरुद्ध खेळताना पंजाब किंग्ज इलेव्हानकडून खेळताना विरेंद्र सेहवागने ५८ बॉलमध्ये १२२ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.

पंजाब किंग्ज इलेव्हनकडून खेळताना २०१४ मध्ये फायनल मॅचदरम्यान वृद्धीमान साहाने कोलकाता विरुद्ध ५५ बॉलमध्ये ११५ धावा करत शतक झळकावले. यावेळी त्याने १० चौकार आणि ८ षटकार ठोकले होते.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा शेन वॉटसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फायनल मॅचमध्ये ५७ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. यामध्ये ११ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. हा सामना २०१८ मध्ये खेळला गेला होता.

यंदाच्या सीझनमध्ये फॉर्मात असणारा रजत पाटीदारने २०२१ मध्ये आरसीबी संघाकडून पदार्पण केले. यावेळी त्याने एलिमिनेटर सामन्यात ५४ बॉलमध्ये ११२ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.