Republic Day : भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सकाळ डिजिटल टीम

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मारक असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना प्रमुखही उपस्थित होते.

दिल्लीतील राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक प्रदान करण्याच आले.

भारताच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राज्यांच्या चित्ररथांनी देशवासीयांचे लक्ष वेधले.

भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंट यावेळी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंट यावेळी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

लष्कराच्या जवानांनी केलेल्या अनेक साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

लष्कराच्या जवानांनी केलेल्या अनेक साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

कडाक्याच्या थंडीमध्येही दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

भारताच्या भूदलाची ताकद असणारे विविध रणगाडे राजपथावर पाहायला मिळाले.सेंच्युरियन टँक, PT-76, MBT अर्जुन MK-I आणि APC टोपाझच्या तुकड्या दिल्लीतील राजपथ येथे RepublicDay परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्यावतीने लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.