हसरंगाने चहलकडून पर्पल कॅप हिसकावली, टॉप पाच गोलंदाज कोण?

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये यंदाच्यावर्षी १० संघ सहभागी झाले होते.

आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात, 2008 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर पहिल्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता.

गेल्या वर्षी ड्वेन ब्रावो याच्या आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी करून हर्षल पटेलने पर्पल कॅप पटकावली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.

ंदाच्या वर्षी वानिंदू हसरंगा टॉप पाच मध्ये आहे. आरसीबीकडून त्याने १६ मॅचदरम्यान २६ विकेट्स घेतल्या आहेत.

युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने राजस्थानकडून खेळताना १६ मॅचदरम्यान २६ विकेट्स घेतल्या आहेत.

पंजाबकडून खेळाणार कसिगो रबाडा ने १३ मॅचदरम्यान २३ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

हैदराबादचा सर्वात वेगाने टाकणार युवा गोलंदाज उमरान मलिकने १४ मॅचमध्ये २२ बळी टिपले.

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने १४ मॅचमध्ये २१ गडी बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.