Koffee with Karan 7: बापरे! एका एपिसोडचं करण घेतो इतकं मानधन

प्रणाली मोरे

प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शो 'कॉफी विथ करण' च्या 7 व्या सिझनला येत्या 7 जूलैपासून सुरवात होत आहे. करण जोहरने शो ची तारीख सोशल मीडियावर हटके प्रोमोच्या माध्यमातून जाहीर केली होती.

Esakal

हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या शो मुळे सेलिब्रिटींच्या अनेक इनसाइड न्यूजचा खुलासा होतो अन् मग हेडलाइन्सचा धुरळा उडतो.

Esakal

'कॉफी विथ करण' हा शो हिट होण्याचं जास्त क्रेडिट हे करण जोहरला द्यावच लागेल. त्याचं खुमासदार निवेदन त्यासोबतच सेलिब्रिटींची पोलखोल मजेदार स्टाइलमध्ये करण्याची त्याची स्टाइल चाहत्यांच्या याआधीच पसंतीस उतरली आहे

Esakal

आता शो ला इतकी पसंती मिळतेय म्हटल्यावर अर्थातच करण जोहर या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी तगडं मानधन आकारणार हे ओघाने आलंच. 'कॉफी विथ करण'च्या 7 व्या सिझनसाठी करणने आकारलेल्या फी चा आकडा पाहून डोळे गरगरतील एवढं मात्र नक्की. करणनं यंदाच्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी 1 ते 2 करोड चार्ज केल्याचं कळत आहे.

Esakal

प्रत्येक सिझनमध्ये करण कमीत कमी 20 एपिसोड्स होस्ट करतो. तेव्हा या सिझनमध्ये त्यानं 40 करोड खिशात घातलेयत म्हणायला हरकत नाही. अर्थात त्याच्या भोवती असलेलं प्रसिद्धिचं वलय पाहता, 'इतना तो हक उसका बनता है यार...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal