स्वाती वेमूल
अभिनेत्री फातिमा सना शेख 'दंगल गर्ल' म्हणूनही ओळखली जाते.
'दंगल' या पहिल्याच चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
फातिमाने बालकलाकार म्हणूनही काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
'चाची ४२०' आणि 'वन टू का फोर' या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
तिने काही मालिकांमध्येही काम केलं.
'अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो', 'लेडीज स्पेशल' यांमध्ये तिने भूमिका साकारल्या.
अभिनयाशिवाय फातिमाला फोटोग्राफी आणि नृत्याची प्रचंड आवड आहे.
११ जानेवारी १९९२ रोजी फातिमाचा जन्म हैदराबादमध्ये झाला.
फातिमाचं नाव अनेकदा आमिर खानसोबत जोडलं गेलं.
'कुछ तो लोग कहेंगे' असं म्हणत तिने आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
काही दिवसांपूर्वी आमिर आणि फातिमाच्या लग्नाच्याही चर्चा होत्या.
मात्र व्हायरल झालेला दोघांचा फोटो बनावट असल्याचं स्पष्ट झालं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.