शेताच्या बांधावरून लोकराजाला अनोखी मानवंदना!

सकाळ डिजिटल टीम

निगवे खालसा (ता. करवीर) येथे शेतात काम करणाऱ्या महिलांनी शाहू महाराजांना १०० सेकंद उभे राहून अभिवादन केले.

शेताच्या बांधावरून बळीराजाकडून लोकराजा शाहू महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली!ऊ

अगदी हाताचे काम बाजूला ठेवून आपल्या राजासाठी कोल्हापूरकर कृतज्ञ झाले. शेताला जाताना वाटेतच त्यांनी राजांना मानवंदना दिली.

कोल्हापूर शहरातील वायलडर मेमोरियल चर्च येथे ख्रिस्ती बांधवांनी लोकराजाला मानवंदना देत स्तब्धता पाळली.

घडुनपीर दर्गाह, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मुस्लिम बांधवांनी राजांना १०० सेकंद स्तब्ध राहुन अभिवादन केले.

कोल्हापूर-चंदगड बस थांबवून नागरिकांनी राजांना आदराजंली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.