विमानतळावर मलायकाचा विना मेकअप 'ग्लॅमरस' अंदाज

Balkrishna Madhale

बाॅलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा विना मेकअपची मुंबई विमानतळावर फिरताना दिसलीय. मलायका मेकअप न करताही खूप ग्लॅमरस दिसत आहे.

मलायकाची ही अदा विमानतळावर उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यात कैद केलीय.

मलायका अरोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

सध्या मलायका रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या सीझन 2 साठी जज करताना दिसत आहे.

मलायका व्यतिरिक्त गीता कपूर आणि टेरेन्स लुईस देखील या 'शो'ला जज करत आहेत.

याशिवाय, मलायका अभिनेता मिलिंद सोमणसोबत एमटीव्हीच्या 'सुपरमॉडेल ऑफ द इयर 2' या शोलाही जज करताना दिसत आहे.

बॉलीवूडच्या दुनियेत मलायका तिच्या फिटनेबाबत चांगलीच चर्चेत असते. मात्र, काही दिवसांपासून मलायका अर्जुन कपूरला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora