जंतुसंसर्गाला आळा घालायचा आहे, करा लसणाचा असा उपयोग

सकाळ डिजिटल टीम

जंतांची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या आहारात लसूण अंतर्भूत करणे उत्तम असते.

भूक न लागणे, तोंडात कफाचा चिकटपणा जाणवणे, अशात लसूण आले काळे मीठ यांचा ठेचा थोडा थोडा खाता येतो.

थंडी लागल्यामुळे कान दुखणे, दडा बसणे अशा त्रासा मध्ये लसनाची पाकळी सोलून कापसात गुंडाळून कानात ठेवण्याचा उपयोग होतो.

लसूण मोडलेले हाड साधण्यास मदत करणारा आहे. हाड मोडले असता आहारात लसणाचा अंतर्भाव करणे चांगले असते.

जुनाट जखमेतून अधून मधून पाणी असतील तर लसूण बारीक करून जखमेवर लेप लावावा.

लसणाचा रोप घरात ठेवल्याने घरातील हवा शुद्ध होण्यास मदत मिळते. जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.