वायू प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हे उपाय करा...

नमिता धुरी

मुंबईत दिवसेंदिवस वायू प्रदूषणाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे परिणाम टाळायचे असतील तर काही उपाय नक्की करावेत....

कारपुलिंग

ऑफीसला किंवा इतर कुठेही जाताना कारपुलिंग करा. प्रत्येकाने स्वत:ची वैयक्तिक गाडी वापरण्यापेक्षा अनेकजणांनी एकावेळी एकाच गाडीचा वापर करा. यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल.

चांगला आहार

फुप्फुसे स्वच्छ ठेवण्यासाठी गुळ खा. क जीवनसत्त्व आणि 'ओमेगा ३'युक्त आहार घ्या. तुळस आणि आले घातलेला चहा घ्या.

व्यायाम

सकाळच्या वेळेत घराच्या बाहेर व्यायाम करणे टाळा; कारण यावेळी धुरके मोठ्या प्रमाणावर असते.

एअर प्युरिफायर लावा

या यंत्रामुळे घरातील हवा स्वच्छ राहाते. दिवसातील ८ ते १० तास तुम्ही हे यंत्र वापरू शकता.

मास्क लावा

वायू प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी एन ९५ किंवा एन ९९ मास्क लावा.

घरात झाडे लावा

घरात आणि ऑफिसमध्ये कोरफड आणि मनीप्लांट लावा. यामुळे हवा स्वच्छ राहील.

धूम्रपान टाळा

घरात धूम्रपान करणे टाळा. मेणबत्ती पेटवू नका. तसेच कोणतेही रसाययुक्त पदार्थ जाळू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.