वायुसेनेत भरती व्हायचंय ? अशी आहे प्रक्रिया...

नमिता धुरी

वायुसेनेतर्फे AFCAT2 2022 म्हणजेच airforce common admission test चे अर्ज ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

तुम्हालाही वायुसेनेमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर afcat.cdac.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज काळजीपूर्वक भरा. सर्व गटांसाठी अर्जाचे शुल्क २५० रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल.

AFCAT परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना एसएसबी राऊंडसाठी निमंत्रित केले जाईल.

AFCAT अंतर्गत पर्मनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत विविध पदांवर भरती केली जाईल.

पर्मनंट कमिशन पुरुषांसाठी आहे. याअंतर्गत निवड झालेले उमेदवार आपल्या रँकनुसार निवृत्त होईपर्यंत सेवा देऊ शकतात.

या परीक्षेत १०० प्रश्न विचारले जातात. ते सोडवण्यासाठी २ तास दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.