पुरुषांनो, उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी खा! जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे. स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यामुळे अनेक पुरुषांमधील शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.

strawberry very beneficial men health

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

strawberry very beneficial men health

कॅन्सरसारख्या आजाराला जर लांब ठेवायचं असेल तर स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे. स्ट्रॉबेरीमध्ये कॅन्सर सेल्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात.

strawberry very beneficial men health

घराची जबाबदारी पार पाडत असताना अनेकदा पुरुषांवर मानसिक ताण येतो. त्यामुळेच स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे. स्ट्रॉबेरीमध्ये ताण कमी करण्याची क्षमता असते.

strawberry very beneficial men health

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे शरीरातील कार्डिओप्रोटेक्टिव्ह अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे हृदयाशीसंबंधित तक्रारी किंवा समस्या कमी होतात.

strawberry very beneficial men health

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

strawberry very beneficial men health

सतत उन्हात फिरल्यामुळे किंवा जास्त धावपळ केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो. परंतु, स्ट्रॉबेरीमध्ये उर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

strawberry very beneficial men health