खजूर खाण्याचे हे आहेत काही दुष्परिणाम

सकाळ डिजिटल टीम

थिने, जीवनसत्वे, कार्बोहायड्रेट्स आणि लोह यांनी समृध्द असलेले खजूर खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. खजूर दुधात मिसळून खाल्ल्यास पचनशक्ती मजबूत होते.

मात्र खजूर हे आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहेत तसे याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

खजूर खराब होऊ नये म्हणून त्यावर सल्फाइट वापरले जाते, त्यामुळे अनेकांना पोटदुखी, गॅस, पोट फुगणे आणि अतिसार होऊ शकतो.

खजूरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, याच्या अतिसेवनामुळे शरिरात पोटॅशियमची पातळी वाढते याला हायपरक्लेमिया म्हणतात.

खजूरांची अॅलर्जी होऊन दमा देखील होऊ शकतो, त्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांनी खजूर खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

खजूर नैसर्गिकरीत्या गोड असतात आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेह तर होतोच सोबत रक्तदाब देखील वाढू शकतो.

खजूरामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील जास्त असते. एक ग्रॅम खजूरामध्ये सुमारे २.८ कॅलरीज असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ञांकडून योग्य सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.