Pooja Hegde: वय, संपत्ती, महागड्या कार सगळं काही दिमाखदार!

सकाळ ऑनलाईन टीम

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पुजा हेगडेच्या नावाचा दबदबा आहे.

पुजा सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे.

मुंबईतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱी पुजा ही सध्याच्या घ़डीला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

2009 मध्ये ती सर्वप्रथम मिस इंडियामध्ये सहभागी झाली होती. 2010 मध्ये तिनं पुन्हा एकदा सहभाग घेतला होता. त्यात ती दुसऱ्या स्थानावर होती.

मुगामुदीमधून पुजानं चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. ओका लैला कोसम हा तिचा पहिला हिट चित्रपट

पुजाला फिरणे, वाचन करणे, गायन करणे फार आवडते. क्रिकेटची तिला विशेष आवड असून तिला राहुल द्रविड आवडतो.

मुंबईतील बांद्रयामध्ये पुजाचा 3 बीएचके फ्लॅट आहे. त्याची किंमत कोटीत आहे. तिचं मानधनही मोठं आहे. सहा कोटी रुपयांचा तो फ्लॅट आहे.

पुजाकडे अनेक महागड्या गाडयांचा संग्रह आहे. तिला कार चालवणे आवडते. पावणे दोन कोटींपर्यतची कार तिच्याकडे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.