केळी खाल्ल्याने आरोग्यातच नाही तर सौंदर्यातही भर पडते

सकाळ डिजिटल टीम

केळी खाल्ल्याने त्वचा आतून हायड्रेट होते. यामध्ये असणारे व्हिटॅमीन ए हे त्वेचेचा तजेलदारपणा कायम ठेवते.

ऑईली स्किनमधील गरजेपेक्षा अधिक असलेला तेलकटपणा काढण्याचे काम केळी खाल्ल्याने होते. हे त्वचेला एक्सफोलिएटही करते.

केळीमध्ये अॅंटी ऑक्सीडंटचे प्रमाण अधिक असते. जे नैसर्गिक बोटॉक्सचे काम करते.

यामध्ये एंटी इन्फ्लेमेंटरीचे गुण अधिक असतात. याचे छोटे तुकडे चेहऱ्यावर घासल्याने पिंपलची समस्या दूर होते.

केळीमध्ये व्हिटॅमीन ए, जिंक, मॅग्नेशिअम असे पोषक तत्व असतात. हे त्वचेला आतून तजेलदार आणि तरोताजा करण्याचे काम करतात.

यात असणारे व्हिटॅमीन ए हे चेहऱ्यावरील नमी कमी करते. स्कीन ड्राय असेल तर ते सॉफ्ट आणि हलकी बनवण्याचे काम केळ करते.

केळीमध्ये असणारे व्हिटॅमीन ए, बी, सी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असते. हे सर्व केस मजबूत ठेवायला मदत करतात.

केळी आणि दूध यांना समप्रमाणात एकत्र करून हेअर पॅक म्हणूनही वापरु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.