2021 मध्ये होता बॉलीवूडमधील 'या' अभिनेत्रींचा जलवा

सुस्मिता वडतिले

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) : प्रियांका चोप्रा कुटुंब आणि मित्रांसोबत स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. अभिनेत्रीने टू पीस रेड बिकिनीसह व्हाइट श्रग परिधान केला होता जो लुकला पूर्ण केला होता.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) : T20 विश्वचषकासाठी अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत UAE दौऱ्यावर गेली होती. त्यांच्यासोबत मुलगी वामिकाही होती. यादरम्यान अभिनेत्रीने ऑलिव्ह ग्रीन कलरचा मोनोकनी घातला होता. स्विमिंग पूलमध्ये पोज देताना तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

Priyanka Chopra | esakal

परिणीती चोप्रा (Parineeti Chopra):परिणीती चोप्रा तिच्या भावासोबत मालदीव व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पिवळ्या बिकिनीतील अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला होता. ती समुद्रकिनारी एका लाकडी फळीवर बसलेली दिसतीय.

Parineeti Chopra | esakal

सारा अली खान (Sara Ali Khan) : सारा अली खानने स्विमिंग पूलमधून बाहेर पडतानाचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मल्टी-कलर बिकिनीमध्ये दिसली होती.

Sara Ali Khan

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) : जान्हवी कपूरही मित्र आणि टीमसोबत मालदीव व्हेकेशनसाठी गेली होती. यावेळी तिने ब्लॅक आणि रेड कलरची टू पीस बिकिनी घातली होती. यासोबत तिने सारँग नेसून तिचे केस मोकळे सोडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | esakal