त्या दोघी आणि तो... विराटच्या अनुष्काला हटके शुभेच्छा

भक्ती सोमण-गोखले

विराट कोहली(virat kohali) अनुष्का शर्मा (anushka sharma)आज ११ डिसेंबरला लग्नाचा चौथा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. वामिकाचा जन्म झाल्यावर त्यांचा कुटूंब म्हणून हा पहिलाच वाढदिवस आहे.

इंस्टाग्रामवर हटके पोस्ट आणि फोटो टाकून विराटने अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात तो म्हणतो गेली ४ वर्ष तु माझे मुर्ख विनोद आणि आळशीपणा सहन करत आहेस, असे म्हटले आहे.

संपूर्ण जग माझ्या विरोधात असताना तू मला योग्य गोष्टींच्याा पाठीशी उभे राहण्याची प्रेरणा दिली. अनुष्का तू एक प्रामाणिक, प्रेमळ आणि धाडसी स्त्री आहेस, असेही विराट म्हणाला.

देवाना आपल्याला यावेळी खूप मोठा आशिर्वाद दिला आहे.

आजचा दिवस आणखी खास आहे. कारण एक कुटुंब म्हणून आपण पहिल्यांदा एकत्र वाढदिवस साजरा करत आहोत. वामिकामुळे आपलं कुटुंब आणि आयुष्य पूर्ण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.