आशुतोष मसगौंडे
डाळींब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की डाळींब तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते आणि आजारांपासून दूर ठेवते.
डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. याचे सेवन केल्याने पेशी मजबूत होतात.
कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.
डाळिंबाच्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
डाळिंबाचा रस आतड्यांतील जळजळ कमी करून पचन सुधारू शकतो. मात्र, डायरियाच्या रुग्णांना डाळिंब न खाण्याचा सल्ला दिला जातो.
सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवात सूज यांवर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे.
डाळिंबाचा रस हृदयविकारावर फायदेशीर आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.
मधुमेहाच्या उपचारात डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंब इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.