भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी १० अविस्मरणीय देश

Monika Shinde

व्हिसाशिवाय जाऊ शकता

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये परदेशी ट्रिप प्लॅन करताय, पण व्हिसाची प्रक्रिया करायला वेळ नाही? तर घाबरू नका! या देशांमध्ये भारतीय नागरिक व्हिसाशिवाय जाऊ शकतात.

You can go without a visa | Esakal

थायलंड

थायलंडमध्ये ६० दिवसांसाठी व्हिसाशिवाय राहता येते. येथे समुद्रकिनारे, स्ट्रीट फूड आणि नाइटलाइफचा आनंद घेऊ शकता.

Thailand | Esakal

मॉरिशस

मॉरिशसमध्ये ९० दिवस व्हिसाशिवाय राहू शकता. येथे पांढर्‍या वाळूवर आराम करू शकता आणि डॉल्फिनसोबत पोहून मजा घेऊ शकतात.

Mauritius | Esakal

इंडोनेशिया

इंडोनेशियात ३० दिवस व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. बाली आणि कोमोदो बेटांवर आराम करा आणि स्थानिक खाद्याचा अनुभव घ्या.

Indonesia | Esakal

सेशेल्स

सेशेल्समध्ये ९० दिवस व्हिसाशिवाय राहत, आपल्याला समुद्रक्रीडा, जंगल ट्रेकिंग आणि सुंदर बीचेस मिळतात.

Seychelles | Esakal

फिजी

फिजीमध्ये १२० दिवस व्हिसाशिवाय भेट देता येते. समुद्रकिनाऱ्यावर आराम करा, बेटांवर फिरा आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्या.

Fiji | Esakal

सर्बिया

सर्बियात ३० दिवस व्हिसाशिवाय भेट देता येते. बेलग्रेड आणि नोवी सॅडमध्ये फिरा आणि इतिहासाचा आनंद घ्या.

Serbia | Esakal

बार्बाडोस

बार्बाडोसमध्ये ९० दिवस व्हिसाशिवाय राहता येते. समुद्रकिनाऱ्यावर आराम करा आणि कॅरेबियन रमचा आस्वाद घ्या.

Barbados | Esakal

जमायका

जमायका मध्ये ३० दिवस व्हिसाशिवाय जाऊ शकता. रेगे संगीत, सुंदर जलप्रपात आणि समुद्रकिनारे अनुभवायला मिळतात.

jamaica | Esakal

भूतान

भूतानमध्ये भारतीयांना व्हिसा नाही. मठ पाहा, टायगर्स नेस्ट ट्रेक करा आणि भूतानची सुंदरता अनुभवायची!

Bhutan | Esakal

एल सल्वाडोर

एल सल्वाडोरमध्ये ९० दिवस व्हिसाशिवाय राहता येते. येथे सर्फिंग करा, प्राचीन खंडहरांचा अन्वेषण करा आणि साहसिक अनुभव घ्या.

El Salvador | Esakal

तुकोबारायांच्या पालखीला का घातले जाते मेंढ्यांचे रिंगण? जाणून घ्या ही अनोखी परंपरा!

येथे क्लिक करा