१०० वर्षांच्या लाडक्या बहिणीने शतायुषी भावाला बांधली राखी, पाहा भावस्पर्शी फोटो

Vrushal Karmarkar

रक्षाबंधनाचा सण

भावा-बहिणीच्या बालपणीच्या आठवणी, लहान लहान भांडणे, अतूट प्रेम आणि विश्वास यांचे नाते जगात खूप खास आहे. हे नाते आणखी दृढ करण्यासाठी दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.

Raksha Bandhan | ESakal

९ ऑगस्ट

हा सण शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सकाळपासूनच घरांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे.

Raksha Bandhan | ESakal

बहिणीच्या येण्याची वाट

काहींना त्यांच्या भावाच्या घरी पोहोचण्याची घाई आहे, तर काहींना त्यांच्या बहिणीच्या येण्याची वाट पाहत आहेत. सर्वत्र हा सण आनंदात साजरा होत आहे.

Raksha Bandhan | ESakal

भावाबहिणीची चर्चा

तर या आजच्या दिवशी एका भावाबहिणीची चर्चा होत आहे. १०० वर्षांच्या बहिणीने १०४ वर्षांच्या भावाला राखी बांधली आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Raksha Bandhan | ESakal

राहुरी तालुक्यातील भाऊ-बहीण

अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात १०० वर्षांच्या पार्वतबाई भुजाडी यांनी त्यांचे १०४ वर्षांचे भाऊ एच.पी. नारायण दौळे यांना राखी बांधली.

Raksha Bandhan | ESakal

शंभरीचा आकडा

या दोघांनीही वयाच्या शंभरीचा आकडा पार केला आहे. तरी त्यांचे नाते अजून तेवढेच अतूट आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Raksha Bandhan | ESakal

अतूट बंधन

हा रक्षाबंधनाचा एक अनोखा उत्सव होता. जिथे भाऊ आणि बहीण दोघांनीही वयाच्या असूनही त्यांचे अतूट बंधन प्रदर्शित केले आहे.

Raksha Bandhan | ESakal

शतायुषी रक्षाबंधन

या शतायुषी रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा होत आहे. याचे अनेक जण कौतुक करत आहेत. तसेच हा क्षण सर्वांच्या आयुष्यात व्हावा, अशी पार्थना करत आहेत.

Raksha Bandhan | ESakal