Saisimran Ghashi
गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागला
आता अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास 19 मेपासून सुरुवात झाली आहे
पण अकारावीत प्रवेश घेताना तुम्ही काही चुका करणे टाळले पाहिजे
कारण विद्यार्थी आणि पालकांच्याकडून घाईघाईत होणाऱ्या चुकांमुळे ऐनवेळी अडचण येऊ शकते
– नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, मार्क्स किंवा शाळेचे नाव यासारखी माहिती नेहमी अचूक भरा.
– चुकीची माहिती दिल्यास फॉर्म बाद होऊ शकतो किंवा पुढील टप्प्यात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
– महाविद्यालय किंवा शाखा निवडताना त्याचे लोकेशन, कट-ऑफ, आणि अभ्यासक्रमाची आवड विचारात घ्या.
– केवळ मित्र-मैत्रिणी कुठे जात आहेत हे पाहून पसंती देवू नका.
– मार्कशीट, जात प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र यांची स्कॅन कॉपी योग्य फॉरमॅटमध्ये आणि स्पष्ट असावी.
– चुकीचे किंवा अस्पष्ट दस्तऐवज दिल्यास फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
फॉर्म भरताना वेळ काढा, सर्व माहिती नीट वाचा आणि खात्री केल्यानंतरच सबमिट करा. एक लहान चूकसुद्धा प्रवेश प्रक्रियेला अडथळा ठरू शकतो.