कुरकुरीत आणि मोकळी भेंडी हवी? स्वयंपाक करताना या टिप्स वापरा

Aarti Badade

हॉटेलसारखी चमचमीत भेंडी घरी करा!

भेंडीची भाजी चिकट आणि गचगचीत होते? मग या ४ सोप्या टिप्स नक्की फॉलो करा. भाजी होईल मोकळी, कुरकुरीत आणि चविष्ट!

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

भेंडी चिरण्याआधी धुवा

भेंडी चिरण्यापूर्वीच धुऊन घ्या. धुतल्यानंतर सुती कपड्याने ती पूर्णपणे पुसून कोरडी करा. भेंडीवर पाणी राहिल्यास चिरताना चिकटपणा वाढू शकतो.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

भेंडी कोरडी असणं महत्त्वाचं

भेंडी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच चिरा. तुकडे मध्यम आकाराचे ठेवा. खूप बारीक चिरल्यास भेंडीतील चिकटपणा अधिक जाणवू शकतो.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

भाजी झाकून शिजवू नका

फोडणी दिल्यानंतर भेंडी लगेच झाकू नका. झाकणामुळे तयार होणारी वाफ भाजीमध्ये पाणी सोडू शकते. त्यामुळे भेंडी उघडी ठेवून मंद किंवा मध्यम आचेवर शिजवा.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

मीठ शेवटी घाला

भेंडी शिजवताना सुरुवातीलाच मीठ घालणे टाळा. मीठामुळे भेंडी पाणी सोडू शकते आणि चिकटपणा वाढू शकतो. त्यामुळे भाजी जवळपास शिजल्यावर शेवटी मीठ घाला.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

लिंबू किंवा आमचूरची कमाल!

भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी शिजताना थोडा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वापरू शकता. यामुळे भाजीला चटपटीत चवही मिळते.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

आता भेंडी होईल एकदम मोकळी!

भेंडी कोरडी ठेवणे, योग्य आकारात चिरणे, झाकण न ठेवता शिजवणे आणि मीठ शेवटी घालणे या टिप्समुळे भेंडीची भाजी मोकळी, सुटसुटीत आणि चविष्ट बनवण्यास मदत होईल.

Tips to Make Crispy, Non-Slimy Okra at Home

|

Sakal

खोबरेल तेल केसांवर लावताय? वापरण्याआधी 'हे' वाचा

coconut oil hair

|

Sakal

येथे क्लिक करा