अनिरुद्ध संकपाळ
नताशा स्टॅन्कोविच सध्या चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्यासोबत तिचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे.
नताशा स्टॅन्कोविच ही मुळती सर्बियाची आहे. तिने बॉलीवूडमध्ये एक मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सुरूवातीला ती जाहीरातीचून झळकली त्यानंतर प्रकाश झा यांनी सत्याग्रह चित्रपटात तिला पहिला ब्रेक दिला.
प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू गाण्यानंतर नताशा ही खऱ्या अर्थानं फेमस झाली. हे गाणं 2015 मध्ये आलं होतं. या गाण्यातील नृत्यामुळं नताशा प्रकाशझोतात आली.
नताशाने छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. ती सलमान खानच्या बिग बॉस शोच्या आठव्या सिजनमध्ये देखील झळकली होती.
याचबरोबर ती नच बलिए डान्स रियलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती. ती तिचा आधीचा बॉयफ्रेंड ऐली गोनी सोबत या शो मध्ये आली होती.
नताशाने शाहरूख खानच्या झिरो चित्रपटात देखील काम केलं आहे. या चित्रपटात तिने अभय देओलच्या गर्लफ्रेंडची भुमिका निभावली होती. या चित्रपटात शाहरूख खान सोबत अनुष्का शर्मा आणि कटरिना कैफ देखील मुख्य भुमिकेत होत्या.