Monika Shinde
आजकाल सगळं काही ऑनलाईन होतं आहे. पण यासोबतचं धोके देखील वाढले आहेत. अश्यावेळी डिजिटल सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे.
तुमचे डिवाईसला बायोमेट्रिक्स सुरक्षा ठेवा. जसे की फिंगरप्रिंट्स किंवा फेस रेकग्निशन. डिजिटल पेमेंट्ससाठी पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित आहे.
जर तुम्ही आतापर्यंत कार्ड टोकनाइज केले नसेल, तर ते आता करा. यामुळे तुमचे ऑनलाइन पेमेंट्स अधिक सुरक्षित होतील.
सुरक्षित वेबसाइट्स वापरा ज्या "https://" सह सुरू होतात. या संकेतस्थळांवर तुमची माहिती सुरक्षित राहील.
प्रायव्हसी पॉलिसी वाचून तुमचा डेटा कसा वापरला जात आहे हे समजून घ्या. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल.
ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास, त्वरित बँक किंवा पेमेंट प्रदात्याशी संपर्क करा आणि १९३० या हेल्पलाइनवर तक्रार करा.
या टिप्सचे पालन करून तुम्ही डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करू शकता.