Aarti Badade
किवीमध्ये संत्र्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन C असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-फ्लू सारख्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.
किवीतील "अॅक्टिनिडिन" हे एंजाइम प्रथिने पचवायला मदत करते. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
किवीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात, त्यामुळे हृदय निरोगी राहते.
किवी हा सेरोटोनिनचा नैसर्गिक स्रोत आहे. दररोज किवी खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता वाढते आणि निद्रानाश दूर होतो.
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कोलेजन निर्माण होते. यामुळे त्वचा तरुण, गुळगुळीत आणि तेजस्वी राहते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे किवी दीर्घकाळ पोट भरलेले ठेवतो, भूक कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो.
किवीमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन A असतात. हे डोळ्यांना निळ्या प्रकाशापासून वाचवतात आणि दृष्टिक्षमतेस मदत करतात.