Aarti Badade
पावसाळ्यात वातावरण ओलसर व थंड असतं, ज्यामुळे विषाणू आणि बॅक्टेरियांची वाढ होते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं महत्त्वाचं आहे.
रात्री झोपण्याआधी कोमट दुधात हळद टाकून प्या. हळद अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक आहे.
तुळस, आले, मिरे आणि गवती चहा यांचा काढा तयार करा. रोज सकाळी एक कप प्या.
लसूण हे नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. पावसात याचा समावेश आहारात करावा.
पावसात व्हिटॅमिन C चा पुरवठा महत्वाचा. यामुळे शरीरात रोगप्रतिकारक पेशी तयार होतात.
ओले हवामान असलं तरी शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी आवश्यक.
गरम पाण्याच्या वाफेने सर्दी व बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण मिळते.
7-8 तास झोप घ्या. तणाव रोगप्रतिकारशक्ती कमी करतो. ध्यान व योग मदत करतात.