Anushka Tapshalkar
मेथी, पचन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर, जळजळ आणि त्वचेवर पुरळ यासाठी प्राचीन औषधांमध्ये वापरली जाणारी मेथी, केस गळतीवरील याच्या परिणामकारकतेवर मर्यादित संशोधन असले तरी केसांच्या आरोग्यास आवश्यक पोषकतत्वांसह वाढ होण्यास मदत करु शकते.
फॉलीक ऍसिड आणि व्हिटॅमिन्स ए, के, आणि सी यांनी पूरक मेथीच्या बिया केसातील कोंडा दूर करतात आणि केस पातळ होणे, गळणे यांसारख्या समस्या दूर करून केस आणि स्काल्पला निरोगी बनवतात.
मेथीमध्ये निकोटिनिक अॅसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केस गळणे कमी होते आणि केस दाट होऊन योग्य वाढ होते.
मेथीतील लेसिथिन एक नैसर्गिक घटक आहे, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि त्याचसोबत केस मजबूत होतात. मेथीचे तेल किंवा मास्क नियमित वापरल्याने केसांची गळती लक्षणीयरीत्या कमी होते.
मेथीमध्ये लोह आणि पोटॅशियम असते, जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे खनिजे आहेत. यामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केस मुळांपासून वाढण्यास मदत होते.
मेथीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे कोंडा आणि खवखवणाऱ्या टाळूची समस्या कमी होते. स्वच्छ टाळू ही केसांच्या चांगल्या वाढीसाठी गरजेची आहे.
मेथी एक नैसर्गिक कंडिशनर आहे, जी केस मऊ आणि चमकदार बनवते. यामुळे केसांतील गुंता सुटतो आणि कोरडेपणा कमी होतो.
मेथी टाळूची नैसर्गिक pH पातळी संतुलित ठेवते, ज्यामुळे टाळूतील जास्त तेल किंवा कोरडेपणा कमी होतो. टाळू संतुलित असणे केसांच्या निरोगी वाढीसाठी महत्त्वाचे आहे.
मेथीतील अमिनो अॅसिड्स केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतात आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावतात. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केसांचा रंग टिकून राहतो.
मेथीतील व्हिटॅमिन्स आणि खनिजे खराब झालेले केस दुरूस्त करण्यासाठी उपयोगी पडतात. केसांना पर्यावरणीय दुष्परिणामांपासून आणि हानिकारक उत्पादनांपासून संरक्षण मिळते