Aarti Badade
शेवग्याच्या पानांमध्ये उच्च प्रमाणात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतात.
शेवग्याची पाने रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात, खासकरून मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी.
शेवग्याच्या पानांमध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत करण्यात मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
दाहक-विरोधी संयुगे असलेली शेवग्याची पाने खाल्ल्याने आतड्यांचे संतुलन राखते आणि गॅस, पोटफुगी आणि आम्लता कमी करते.
शेवग्याच्या पानांमुळे भूक कमी होते, तसेच ते मेटाबोलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जलदगतीने जाळण्यास मदत करते.
शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे आहेत.
शेवग्याच्यी पानांमध्ये असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन नियंत्रित ठेवता येते.
शेवगाच्या पानांतील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C तुम्हाला सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण देतात.
दररोज शेवग्याच्यी 5-6 ताजी पाने खाणे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकते.