सकाळ डिजिटल टीम
हिरकणी बुरुज मागे असलेली कथा एका निर्भीड वाघिणीसारखी असलेल्या हिरकणीची आहे, जिने आपल्या बाळाच्या प्रेमापोटी अनोखा पराक्रम केला.
हिरा नावाची गवळण रायगडाच्या पायथ्याशी राहायची आणि रोज दूध विकायला गडावर यायची.
सूर्य मावळल्यावर गडावर दरवाजे बंद होतात, आणि हिराला परत जाण्याची संधी मिळत नाही.
दरवाजे बंद झाल्यावर हिरकणीने रायगडाच्या खडतर कड्यावरून उतरली
कडा अत्यंत निमुळता, खोल आणि खडतर होता, पण हिरकणीने तो उतरून बाळाच्या कडे पोहचली.
एक रात्रीतच तिचा पराक्रम सगळ्या गावात पसरला आणि अखेर तो महाराजांच्या कानावर गेला.
महाराजांना हिरकणीचा पराक्रम समजला आणि त्यांनी तिला साडी चोळी आणि इनाम देऊन तिच्या शौर्याचं कौतुक केलं.
हिरकणीच्या धाडसाची गोष्ट लक्षात राहावी म्हणून महाराजांनी रायगडाच्या त्या कड्याला "हिरकणी बुरुज" असं नाव दिलं.
हिरकणीने दाखवलेली धाडसाची गोष्ट हे एक उदाहरण आहे की, एक आई आपल्या बाळाच्या प्रेमापोटी किती मोठं धाडस करू शकते.
हिरकणीचा पराक्रम केवळ त्या काळातच नाही, तर आजही लोकांच्या मनात आहे.