Amit Ujagare (अमित उजागरे)
भारतातील स्कूटर्सचा राजा म्हणून ओळख मिळालेल्या होंडाच्या अॅक्टिव्हानं आता कात टाकली असून इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा लॉन्च झाली आहे.
दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा ईव्ही लॉन्च करण्यात आली आहे.
Activa e च्या बेसिक व्हेरियंटची किंमत 1.17 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत १.५२ लाख रुपये आहे.
सुरुवातीला देशातील फक्त तीन शहरांमध्ये ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यांमध्ये फेब्रुवारीत बंगळुरु, एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईत याची विक्री सुरु होईल.
सध्या लॉन्च ऑफरमध्ये केवळ १००० रुपयांत Activa e बूक करता येणार आहे.
पेट्रोल मॉडेलच्या बॉडीवरच ही अॅक्टिव्हा तयार करण्यात आली आहे, पण तरीही याचं डिझाईन वेगळं आहे. साईड इंडिकेटर्स आणि हेडलँप LED मध्ये आहे.
Activa e स्वॅपेबल बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १.५ kWh क्षमतेच्या दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत.
यासाठी होंडा पावर पॅक एनर्जी इंडिया (HEID) बंगळुरुमध्ये २५०, दिल्लीत १५० आणि मुंबईत १०० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारणार आहे.
म्हणजेच जर बॅटरीची चार्जिंग संपणार असेल तर या स्टेशनवर जाऊन तुम्ही एका मिनिटात दुसरी बॅटरी स्कूटरमध्ये लोड करु शकता. यामुळं तुमचा चार्गिंचा वेळ वाचणार आहे.
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर १०२ किमीची रेंज देते, तसंच यामध्ये तीन रायडिंग मोड आहेत.