Payal Naik
'सिंघम' फेम लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड चढउतारांनी भरलेलं होतं.
त्यांचा जन्म २६ मार्च १९६५ रोजी बंगळुरू येथे झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. मात्र त्याच्याबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील.
१९९४ मध्ये त्यांनी तमिळ अभिनेत्री ललिता कुमारीशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली, दोन मुली मेघना आणि पूजा व एक मुलगा सिद्धू.
सिद्धू ५ वर्षांचा असताना त्याचं निधन झालेलं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं होतं.
ते म्हणाले, 'तो फक्त ५ वर्षांचा होता आणि एक फूट उंच टेबलावर पतंग उडवत होता आणि अचानक तो त्यावरून पडला.
काही महिन्यांनंतर, त्याला झटके येऊ लागले आणि त्यानंतर तो मरण पावला. कारण काय होते हे कोणालाही समजले नाही.
त्याचा मृतदेह आमच्या शेतातच जाळला होता. बऱ्याचदा मी तिथे जाऊन बसतो आणि मला जाणवते की मी किती असहाय्य आहे.
आयुष्यात कसलाच भरोसा नाही, ते खूप छोटे आहे. निसर्गासमोर तुम्ही खूप कमकुवत आहात. मला माझ्या मुली खूप आवडतात पण तरीही मला माझ्या मुलाची खूप आठवण येते.
मुलाच्या निधनानंतर प्रकाश राज आणि त्यांच्या पत्नीमधील नातेही बदलले. दोघांनीही त्यांचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, २०१० मध्ये, त्यांनी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या बॉलिवूड कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले.
का झालेला तेजश्री प्रधानचा घटस्फोट? शशांकने केलेले गंभीर आरोप