सकाळ डिजिटल टीम
अभिनेता सुनील शेट्टी याने एका मुलाखतीत त्याच्या वडिलांच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे.
अभिनेत्याचे वडील हे पळून मुंबईत आले होते. त्यांना वडील नव्हते तर तीन बहिणी होत्या.
त्यांना एका दक्षिण भारतीय हॉटेलमध्ये काम मिळालं. ते वेटरचं काम करायचे.
त्यांचं काम टेबल साफ करणं होतं. ते लहान होते त्यामुळे त्यांना टेबल साफ करण्यासाठी चार फेऱ्या माराव्या लागायच्या.
ते भाताच्या पोत्यावर झोपायचे. त्यांनी तिथे बरीच वर्ष काम केलं.
एकवेळ अशी आली की ते मालकाच्या तिन्ही इमारती सांभाळू लागले.
बॉस निवृत्त झाल्यावर त्यांनी त्या तिन्ही इमारती विकत घेतल्या. आजही त्या माझ्याकडे आहेत.
माझ्या वडिलांच्या तुलनेत मी काहीच केलं नाहीये असं मला नेहमी वाटतं, असं सुनील म्हणाला.