kimaya narayan
अभिनेत्री प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखलं जातं. अतिशय लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्री सोशल मीडियावरही चर्चेत असते.
नुकताच तिचा फुलवंती हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा सिनेमागृहात सुपरहिट झाला.
सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर प्राजक्ताने लगेच तिच्या गुरूंच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली. महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बॅंगलोर आश्रमात आश्रमवासी असते.आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन. अशी पोस्ट तिने शेअर केली होती.
तर नुकतीच तिने तिचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. त्यांच्याशी तिने अध्यात्मविषयी चर्चा केली.
यावेळी तिने श्री श्री रविशंकर यांची बहीण भानू नरसिंहम यांचीही भेट घेतली.
सोशल मीडियावर तिने तिच्या या आश्रमातील वास्तव्याचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी तिचं यासाठी कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर याबाबत टीका केली आहे.