Saisimran Ghashi
अभिनेत्री रेखा या बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
रेखाचे आयुष्य हे खूप चर्चेत राहिले आहे. यामागे एक कारण होते ते म्हणजे रेखाचे प्रेमसंबंध.
अभिनेत्री रेखाचे बिग बी सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत प्रेमसंबंध राहिले आहेत. त्यावेळी अमिताभ विवाहित होते.
रेखाचे फक्त अमिताभ सोबतच नाही तर अभिनेता जितेंद्रसोबतदेखील संबंध असल्याच्या चर्चा होत्या. जितेंद्र यांच्या बायकोने रेखाला 'घर तोडणारी' असे म्हंटले होते.
अभिनेता विनोद मेहरा आणि रेखामध्ये प्रेमसंबंध असल्याची पुष्टी त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने केली होती. या जोडीने लपून लग्न केल्याचे देखील म्हटले जात होते.
खिलाडियो के खिलाडी या चित्रपटादरम्यान रेखा आणि अभिनेता अक्षय कुमार प्रेमात पडल्याच्या अफवा होत्या.
रेखाने 1990 सालामध्ये मुकेश अग्रवालसोबत विवाह केला होता. पण लग्नाच्या 6 महिन्यातच त्यांच्या पतीने राहत्या घरी जीव दिला होता.
रेखा यांनी लग्न केले आहे असे अधिकृतपणे जाहीर केले नाही पण तरीही त्या सिंदूर लावतात.
रेखा सिंदूर का लावतात, कुणाच्या नावाने लावतात, विवाह न करता सिंदूर कसे काय लावतात हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.