उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी खायलाच हवीत 'ही' फळे

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

कडक उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या उकाड्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

डिहायड्रेशन

या दिवसांमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होणे होय.

फळे

डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही फळांची मदत घेऊ शकता. ही फळे खाल्ल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे शरीर हायड्रेटेड राहील.

अननस

अननसामध्ये विपुल प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळतो. या दिवसांमध्ये अननसाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

संत्रा

व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले संत्री हे फळ पाण्याचा उत्तम स्रोत आहे. त्यातील उच्च पाण्याचे प्रमाण तुम्हाला गरम हवामानात हायड्रेटेड ठेवते.

स्ट्रॉबेरी

चवीला चांगले असणारे हे फळ पोषकघटकांनी परिपूर्ण आहे. स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

कलिंगड

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात ९२ टक्के पाणी आढळते.

उन्हाळ्यात तुमच्या भुभू आणि माऊची अशी घ्या काळजी

Summer pet care tips | esakal