आग्र्याहून सुटकेनंतर शंभुराजे अनेक महीने 'या' हवेलीत गुप्तपणे राहिले होते

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका

आग्र्याला दरबारभेटीसाठी आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने दगाफटका करून नजरकैदेत बंद केले.

chhatrapati sambhaji maharaj | esakal

आग्र्याच्या कैदेतून सुटका

शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचे भासवत नजरकैदेत मोठ्या संख्येने फळांची टोपली मागवली.

shivaji maharaj sambhaji maharaj | esakal

टोपलीतून बाहेर पडण्याची योजना

संभाजीराजांसाठी आणि स्वतःसाठी दोन मोठ्या टोपल्या तयार करण्यात आल्या. गुप्तपणे त्या टोपल्यांमध्ये लपून दोघेही कैदेतून सुटले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

गुप्त मार्गाने मथुरेचा मार्ग धरला

टोपल्यातून सुटल्यानंतर मुघलांना चकवा देत शिवरायांनी छुप्या वाटांनी मथुरेकडे प्रयाण केले.

chhatrapati sambhaji maharaj | esakal

संध्याकाळी मथुरेला आगमन

असं म्हणतात की सांजवेळी शिवाजी महाराज व त्यांच्या सोबत्यांनी यमुना पार केली. एका झाडीत विश्रांती घेत अंधारात अंबिका वन गाठले.

Sambhaji Maharaj | esakal

अंबिका वनात देवीपूजन

शिवाजी महाराजांनी पावसात भिजत देवीची पूजा करून सुवर्ण छत्र अर्पण केलं असल्याच्या कथा सांगितल्या जातात.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

विश्राम घाटावर मुंडन संस्कार

प्रभातकाळी पितापुत्राचे मुंडन करून वेषांतर करण्यात आलं. शिवाजी महाराज साधूंच्या वेषात पुढे निघाले.

Sambhaji Maharaj | esakal

कृष्णाजी त्रिमल

मथुरेत शिवाजीराजांचे तीर्थगुरू मकरंद भट व गोवर्धन राहत होते. शिवाय पेशवा मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल मथुरेत होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj and Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

संभाजी महाराज मथुरेत

मथुरेत कृष्णाजी त्रिमल यांच्या हाथीवाली गली येथील एका हवेलीमध्ये संभाजी महाराज अनेक महीने राहिले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

२० नोव्हेंबर १६६६ - राजगडावरील पुनरागमन

मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला शिवराय राजगडावर पोहोचले. त्यानंतर २-४ महिन्यांनी संभाजी महाराज स्वराज्यात परतले.

chhatrapati sambhaji maharaj | esakal

अभिनय सोडून कारगिल युद्धात सहभागी झालेला फक्त 'हा' मराठी कलाकार

nana patekar | esakal
येथे क्लिक करा