Sandip Kapde
२४ जून १९९९… कारगिल युद्ध शिगेला पोहोचले होते. भारतीय वायुसेनेच्या ‘जग्वार’ने ऐतिहासिक उडाण घेतली होती
भारतीय जग्वार फायटर प्लेनला लेसर गाईडेड बॉम्ब टाकायचे होते. एक विमान लक्ष्य ठरवत होते, दुसरे बॉम्ब टाकणार होते.
निशाणा चुकला… आणि बॉम्ब टार्गेटच्या थोडक्याच अंतरावर कोसळला. एक मोठा संधीचा क्षण हुकला.
गुलटेरी कॅम्पमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि सेना प्रमुख परवेज मुशर्रफ उपस्थित होते!
जर निशाणा अचूक लागला असता, तर कारगिल युद्धाचं पारडं पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकलं असतं.
पाकिस्तानने ही माहिती जगापासून लपवली. त्यांच्या गुप्ततेचे कारण म्हणजे त्यांची 'नाक कापली जाणं'.
भारतीय सरकारच्या नोंदीनुसार, पॉइंट ४३८८ वर हल्ला केला गेला होता, पण बॉम्ब चुकीच्या ठिकाणी पडला.
गुलटेरी LoC च्या ९ किमी आत होतं. वायुसेनेने तिथे घुसून हल्ला करण्याची मागणी केली होती, पण वाजपेयींच्या आदेशामुळे ती नाकारली गेली.
हा हल्ला यशस्वी ठरला असता, तर कारगिल युद्ध वेगळ्या दिशेने वळलं असतं. नवाज आणि मुशर्रफ यांचा शेवट तिथेच झाला असता.
एक बॉम्ब, एक चूक, आणि इतिहासाचं एक नवं पान न लिहिलं गेलं. कारगिलचा युद्धकथा अजूनही अर्धवटच राहिली…