एसीचं कूलिंग टनामध्ये का मोजलं जातं?

सकाळ डिजिटल टीम

सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे अनेकांचा कल एसी घेण्याकडे असतो

घरामध्ये, ऑफिसात एसी लावण्याचं प्रमाण आता वाढलं आहे

परंतु जेव्हा आपण एसी घ्यायला जातो, तेव्हा तो किती टनाचा हवाय, असं विचारलं जातं

AC मधून मिळणारं कूलिंग मोजण्याचं टन हे प्रमाण आहे

एक टन बर्फाचा जेवढा थंडावा मिळेल, तेवढा थंडावा एक टनाचा एसी देईल

दोन टनाचा एसी घेतला तर तो दोन टन बर्फाएवढा थंडावा देऊ शकेल, असं त्याचं गणित आहे

जेवढा जास्त टनाचा एसी घेऊ तेवढा जास्त थंडावा मिळणार आहे

साधारण १०० चौरस फुटाच्या रुमसाठी एक टनाचा एसी घ्यावा लागतो