सकाळ डिजिटल टीम
अकबर बीरबल यांचे किस्से जवळपास पाच शतकानंतरही सांगितले जातात. त्यांच्यातल्या मैत्रीचंही उदाहरण दिलं जातं.
Akbar Birbal
Esakal
बीरबल यांचे खरे नाव महेश दास होते. ते सामान्य कुटुंबातून आले, पण त्यांच्या बुद्धिमत्ता, काव्यकौशल्य आणि हजरजबाबीपणामुळे अकबर यांच्या दरबारात पोहोचले.
Akbar Birbal
Esakal
महेश दास यांच्या बुद्धीने प्रभावित होऊन अकबर यांनी त्यांना 'बीरबल' ही पदवी दिली. पुढे ते मुगल दरबारातील नवरत्नांपैकी एक बनले.
Akbar Birbal
Esakal
अकबर आणि बीरबल यांचं नातं केवळ राजा-दारबारी इतकंच नव्हतं. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अकबर अनेकदा बीरबलांचा सल्ला घेत असत आणि त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवत.
Akbar Birbal
Esakal
बीरबलांना मिळणारा मान, अकबरांची जवळीक आणि त्यांची हजरजबाबी शैली यामुळे अनेक दरबारी त्यांच्यावर जळत असत. तरीही अकबरांचा त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी झाला नाही.
Akbar Birbal
Esakal
1586 मध्ये उत्तर-पश्चिम मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात बीरबल वीरमरण पावले. हा अकबरांसाठी वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या मोठा धक्का होता.
Akbar Birbal
Esakal
इतिहासातील नोंदीनुसार, बीरबलांच्या मृत्यूची बातमी समजताच अकबरांनी दोन दिवस अन्न ग्रहण केलं नाही. त्यांच्या विश्वासू मित्राच्या निधनाने ते अत्यंत दुःखी झाले होते.
Akbar Birbal
Esakal
अकबर-बीरबलांची मैत्री सांगते की विश्वास, प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि परस्पर सन्मान हीच खरी मैत्रीची पायाभरणी असते. म्हणूनच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ही जोडी आजही प्रेरणादायी मानली जाते.
Akbar Birbal
Esakal