सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि तरुणाईची लाडकी अनन्या पांडे ‘केसरी चॅप्टर २’ मध्ये एकत्र झळकणार आहेत.
‘केसरी चॅप्टर २’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’ चित्रपटाचा उत्तरार्ध आहे.
हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा आहे आणि तो प्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्यसैनिक सी. शंकर नायर यांच्या जीवनावर आधारित आहे.
सी. शंकर नायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातील पीडितांना न्याय मिळवण्यासाठी ब्रिटिश सत्तेशी झुंज दिली होती.
अक्षय कुमार या चित्रपटात पुन्हा एकदा स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अनन्या पांडे या चित्रपटात अक्षय कुमारच्या सोबत पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल.
अभिनेता आर. माधवन देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
आधी ‘शंकर’ असे चित्रपटाचे शीर्षक ठेवले होते, पण नंतर ते बदलून ‘केसरी चॅप्टर २’ ठेवण्यात आले.
‘केसरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, त्यामुळे नव्या चित्रपटाच्या नावात त्याची छाप दिसून येते.
हा चित्रपट १४ मार्च रोजी, होळीच्या सणाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांना या ऐतिहासिक चित्रपटाची आणि अक्षय कुमार- अनन्या पांडे या नवीन जोडीची उत्सुकता लागली आहे.